बॅनर न्यूज

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का; माजी नगरसेवक संदिप वाघेरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. पिंपरीगावातील भाजपचे नगरसेवक संदिप वाघेरे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मध्ये मोठा उलटफेर होणार असून, भाजपला मोठा फटका बसण्याची राजकीय चिन्हे दिसत आहेत.

शिवसेना उबाठा गटाचे शहरप्रमुख संजोग वाघेरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचे माजी नगरसेवक संदिप वाघेरे हे नाराज झाले होते. त्यांनी रविवारी पिंपरीगावातील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन वेगळा निर्णय घेण्याची भूमिका जाहीर केली होती. दुसऱ्याच दिवशी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संदिप वाघेरे यांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. यावेळी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते. संदिप वाघेरे हे पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील दिग्गज नेते मानले जातात. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे संपूर्ण चार नगरसेवकांच्या पॅनलवर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे भाजपला पिंपरीगावात विजयासाठी झुंजावे लागण्याची शक्यता आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button