किवळे–विकासनगरमध्ये भाजपच्या दिपक भोंडवे यांचा आक्रमक प्रचार
घरोघरी जाऊन थेट जनसंवाद; विकासासाठी कटिबद्ध उमेदवाराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद

पिंपरी : किवळे, विकासनगर परिसरात भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार दिपक भोंडवे यांनी घरोघरी जाऊन आक्रमक आणि थेट प्रचार करत संपूर्ण प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वातावरण तापवले आहे. सकाळपासून सुरू होणाऱ्या या प्रचारातून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत विरोधकांच्या अपयशांवर जोरदार प्रहार केला आणि प्रभागातील विकासाचा ठोस अजेंडा जनतेसमोर मांडला.
“फक्त घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करणारे नेतृत्व आता जनतेला नको आहे. किवळे–रावेत-मामुर्डी, प्रभाग क्रमांक १६ मध्ये प्रत्यक्ष काम करणारा, विकास दाखवणारा आणि उत्तरदायित्व स्वीकारणारा प्रतिनिधी हवा,” असा ठाम सूर भाजपच्या दिपक भोंडवे यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला. गेल्या अनेक वर्षांपासून विकासनगर भागात प्रलंबित असलेल्या रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी थेट टीका केली.
विकासनगर भागात घरोघरी भेटी तसेच बाजारपेठेतील लहान-मोठ्या व्यावसायिकांसोबत संवाद साधत भाजपच्या दिपक भोंडवे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन दिले. “निवडणूक आली की फक्त दिसणारे नेते नव्हे, तर वर्षभर जनतेमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता म्हणून मी नेहमी तुमच्यासोबत आहे,” असे सांगत त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विविध विकास योजनांची माहिती नागरिकांना दिली.
या प्रचारात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. युवकांसाठी रोजगार, महिला सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तसेच परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्पष्ट रोडमॅप असल्याचे भाजपच्या दिपक भोंडवे यांनी ठामपणे नागरिकांसमोर मांडले. भाजप कार्यकर्त्यांनीही “दिपक भोंडवे म्हणजे विकास, शिस्त आणि पारदर्शकतेचे नेतृत्व” असा विश्वास व्यक्त केला.
किवळे–विकासनगरमध्ये सुरू असलेल्या या आक्रमक प्रचारामुळे राजकीय समीकरणे बदलत असून, भाजपच्या बाजूने जनमत वेगाने झुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. “यावेळी निवडणूक ही केवळ व्यक्तीची नसून विकास विरुद्ध निष्क्रियतेची आहे,” असा स्पष्ट संदेश देत भाजपच्या दिपक भोंडवे यांनी प्रभाग क्रमांक १६ मधील मतदारांना निर्णायक विजयासाठी आवाहन केले.



