भाजपचे दिपक भोंडवे यांनी किवळे–विकासनगर परिसर प्रचारासाठी पिंजून काढला

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमधील किवळे व विकासनगर परिसरात भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांनी निवडणूक प्रचाराचा अक्षरशः झंझावात निर्माण केला आहे. घरोघरी जाऊन, नागरिकांशी थेट संवाद साधत भोंडवे यांनी संपूर्ण परिसर प्रचारासाठी पिंजून काढला आहे. “जनतेपर्यंत पोहोचायचं, त्यांचा आवाज ऐकायचा आणि विकासाचा ठोस रोडमॅप मांडायचा” हा स्पष्ट संदेश त्यांनी या प्रचारातून दिला आहे.
प्रचारादरम्यान नागरिकांकडून दिपक भोंडवे यांना मोठ्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विकासकामांचा लेखाजोखा, भाजप सरकारची कामगिरी आणि पुढील काळातील योजनांबाबत भोंडवे यांनी प्रभावीपणे भूमिका मांडली. अनेक ठिकाणी स्थानिक प्रश्नांवर थेट चर्चा करत, “काम करणारा नेता कोण?” हा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांची पोलखोल केली. किवळे–विकासनगर परिसरात भाजपच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी पाहता दिपक भोंडवे यांची जनाधाराची ताकद स्पष्टपणे दिसून येत आहे. घराघरांतून मिळणारा पाठिंबा आणि कार्यकर्त्यांमधील जोश यामुळे दिपक भोंडवे यांच्याकडून भाजपचा प्रचार अधिकच आक्रमक होत चालला आहे.
या आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे वातावरण तापले असून, भोंडवे यांच्या प्रचारसभांना वाढती उपस्थिती आणि कार्यकर्त्यांमधील उत्साह यामुळे भाजप प्रचारात निर्णायक आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आगामी दिवसांत हा प्रचार आणखी वेग घेणार असल्याने निवडणूक लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.



