बॅनर न्यूज

“काम, विकास आणि विश्वास… रावेत-गुरूद्वारा-किवळे-मामुर्डीचा बुलंद आवाज – दिपक भोंडवे!”  

साईनगर–शिंदेवस्तीमध्ये भाजपच्या दिपक भोंडवे यांचा प्रचाराचा दणदणीत झंझावात

Spread the love

पिंपरी : प्रभाग क्रमांक १६, रावेत-गुरूद्वारा-किवळे-मामुर्डीतील भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांनी शुक्रवारी साईनगर आणि शिंदेवस्ती परिसरात जोरदार प्रचार करत संपूर्ण परिसर पिंजून काढला. घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि विकासाचा स्पष्ट अजेंडा मांडत भोंडवे यांनी प्रचाराला आक्रमक धार दिली. तसेच पदयात्रा काढून प्रचाराचा झंझावात निर्माण केला. त्यांचे घरोघरी नागरिकांनी आपल्या कुटुंबातील व्यक्ती समजून स्वागत केले आणि निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

“विकास हेच आमचे ध्येय आणि जनतेचा विश्वास हीच आमची ताकद,” असे ठामपणे सांगत भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांनी प्रभागातील स्थानिक प्रश्नांवर थेट भूमिका मांडली. रस्ते, पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि मूलभूत सुविधांसाठी भाजप सरकारने केलेली कामे त्यांनी प्रभावीपणे मांडली. या प्रचारादरम्यान दिपक भोंडवे यांना नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटकांनी भोंडवे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. भाजपच्या धोरणांवर आणि दिपक भोंडवे यांच्या कामगिरीवर नागरिकांनी शिक्कामोर्तब करत विजयाचा निर्धार व्यक्त केला.

साईनगर–शिंदेवस्तीमध्ये झालेल्या या प्रचाराने निवडणुकीचे चित्र स्पष्ट केले असून, भाजपचे दिपक भोंडवे विकासाच्या लढाईत आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दिपक भोंडवे यांनी शुक्रवारी विकासनगर येथून प्रचाराला सुरूवात केली. या भागातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिक व महिलांनी दिपक भोंडवे यांचे उत्साहात स्वागत केले. त्यानंतर दिपक भोंडवे यांची पदयात्रा किवळे आणि मामुर्डी परिसरात पोहचताच स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत करत पाठिंबा जाहीर केला. दिपक भोंडवे यांनी प्रभागातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा उच्च राखण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या पदयात्रेला मिळालेला कार्यकर्त्यांचा उत्साही प्रतिसाद आणि मतदारांचा सकारात्मक कल पाहता दिपक भोंडवे यांची प्रचार मोहीम विजयाकडे कूच करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.   

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button