बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशाल इतिहास घडविणार!

भाजप–राष्ट्रवादीच्या राजकीय भांडणात अमोल भालेकरांना जनतेची सर्वाधिक पसंती

Spread the love

पिंपरी : प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीने रंगतदार वळण घेतले आहे.  या प्रभागात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये वरून थेट लढत वाटत असली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्हावर लढणारे एकमेव उमेदवार अमोल भालेकर हे मतदारांचे खरे पसंतीचे उमेदवार ठरत असल्याचे राजकीय चित्र स्पष्ट होत आहे. तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये गल्लीबोळातून ते चौकाचौकात, प्रत्येक मतदाराच्या ओठांवर एकच नाव “अमोल भालेकर” हे ऐकू येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये यंदा राजकीय इतिहास घडणार आणि भाजप व राष्ट्रवादीच्या भांडणात अमोल भालेकर यांचा विजय होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. 

भाजप व राष्ट्रवादीच्या पारंपरिक राजकीय भांडणाला कंटाळलेल्या प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांनी यंदा बदलाचा कौल देण्याचा इरादा पक्का केल्याचे दिसत आहे. उच्चशिक्षित, स्वच्छ प्रतिमा, थेट जनसंपर्क आणि ठोस विकासाचा अजेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या आणि मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकरांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घराघरात होत असलेला संवाद, युवकांचा प्रचंड पाठिंबा आणि ज्येष्ठांचा विश्वास यामुळे मशाल चिन्हाने प्रभाग क्रमांक १२ मध्ये नवे राजकीय समीकरण तयार केले आहे.

“प्रभागाचा विकास हेच ध्येय” या भूमिकेवर ठाम असलेल्या अमोल भालेकर यांनी केवळ आश्वासनांवर नव्हे तर कामावर आधारित राजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळेच भाजप–राष्ट्रवादीच्या बलाढ्य यंत्रणेसमोरही प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशाल चिन्ह अधिक तेजाने पेटताना दिसत आहे. हा तेज प्रचाराच्या रणधुमाळीत दिवसेंदिवस आणखी उजळत असल्याचे चित्र आहे. राजकीय जाणकारांच्या मते, प्रभाग क्रमांक १२ मध्ये यंदा इतिहास घडण्याची चिन्हे स्पष्ट असून, जनतेच्या विश्वासावर उभा असलेला मशाल चिन्हावरील उमेदवार अमोल भालेकर हे विजयाच्या दिशेने ठामपणे आगेकूच करत आहेत. यंदा केवळ निवडणूक नाही, तर जनतेच्या मनात बदलाची मशाल पेटलेली आहे, असे प्रभाग क्रमांक १२ मध्ये दिसत आहे.  

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button