इंजिनिअरही आहे आणि कामाचा ‘अनुभव’ही
आकुर्डी गावठाण आणि निगडी प्राधिकरणासाठी धनंजय काळभोरच 'बेस्ट' पर्याय!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक रिंगणात एकूण ३२ प्रभागांमध्ये अनेक उमेदवार आपले नशीब आजमावत असले तरी प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणमधील मतदारांचा कल एका सुशिक्षित आणि अनुभवी नेतृत्वाकडे झुकताना दिसत आहे. माजी नगरसेवक धनंजय काळभोर यांनी त्यांच्या उच्चशिक्षणाचा उपयोग प्रशासकीय कामात आणि अनुभवाचा वापर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी केल्याने ते सध्या प्रभागात सर्वात प्रबळ उमेदवार ठरत आहेत.
स्वतः इंजिनिअर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय काळभोर माजी नगरसेवक सुद्धा राहिले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकासकामे करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा आणि शिक्षणाचा दुहेरी फायदा होणार आहे. या प्रभागात राहणारा मतदार हा सुशिक्षित आणि सुज्ञ असल्यामुळे त्यांना गेल्या दहा-पंधरा वर्षात लोकप्रतिनिधीकडून आलेला अनुभव सुखकारक नाही. त्यामुळे यंदा सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित म्हणून धनंजय काळभोर यांच्या नावाला जोरदार पसंती मिळत असल्याचे प्रभागात चित्र आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणूक प्रचारात घड्याळाचा गजर सुस्साट वाजत असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय काळभोर यांनी आकुर्डी आणि निगडी भागाचे पाच वर्षे लोकप्रतिनिधीत्व केले आहे. नगरसेवक म्हणून काम करताना धनंजय काळभोर यांनी केवळ आश्वासने दिली नाहीत, तर अनेक तांत्रिक आणि जटिल नागरी समस्या मार्गी लावल्या होत्या. महापालिकेच्या कार्यपद्धतीची खडान् खडा माहिती असल्याने, प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यात आणि तो योग्य ठिकाणी खर्च करण्यात ते यशस्वी झाले आहेत. २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण आणि वाहतूकनगरीसह निगडी प्राधिकरणाचा एकच प्रभाग झाला. गेल्या निवडणुकीत धनंजय काळभोर यांना अवघ्या ६७० मतांनी पुन्हा नगरसेवक होण्यापासून हुलकावणी मिळाली. मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये धनंजय काळभोर या एकाच नावाचा जोरदार आवाज घुमत असल्याचे चित्र आहे.
उच्चशिक्षित नेतृत्व: काळाची गरज
आजच्या डिजिटल युगात शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी केवळ घोषणाबाजी करून चालत नाही, तर त्यासाठी तांत्रिक माहिती आणि दूरदृष्टी असलेला लोकप्रतिनिधी हवा असतो. धनंजय काळभोर हे स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम करत असताना आकुर्डी आणि निगडी भागात अनेक मुलभूत सुविधांचे जाळे त्यांनी तयार केले आहे. महापालिकेत अनेक समित्यांवर काम करत असताना प्रभागातील विकासकामांसाठी निधी कसा आणायचा याचेही राजकीय गणित त्यांना चांगलेच उमगले आहे. त्यामुळे धनंजय काळभोर यांचे उच्चशिक्षण प्रभागातील विकासासाठी त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यात आणि आधुनिक सोयी-सुविधा प्रभागात आणण्यास मदत करत आहे. त्यांची ही राजकारणातील जमेची बाजू असून, ते नगरसेवक झाल्यास सुशिक्षीत मतदारांची सर्वाधिक संख्या असलेल्या प्रभाग क्रमांक १५ च्या विकासासाठी मोठा फायदा होईल, असा विचार मतदार करताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीच्या प्रचाराची सर्वाधिक चर्चा होत आहे. या प्रभागातील उमेदवार धनंजय काळभोर यांच्यासह राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांवर कोणताही राजकीय डाग नसल्यामुळे यंदा मतदार त्यांना अधिक पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
मतदारांच्या नजरेत धनंजय काळभोर का आहेत ‘बेस्ट’?
- अभ्यासू वृत्ती: महापालिका सभेत प्रभागाचे प्रश्न पुराव्यासहित मांडण्याचे कौशल्य.
- पारदर्शक कारभार: कामाचा दर्जा आणि नियोजनात शिस्त.
- उपलब्धता: पद असो वा नसो, जनतेसाठी सदैव तत्पर.



