प्रभाग क्रमांक १५ मध्ये घोटाळेबाजांवर जनता भारी; घड्याळाच्या धनंजय काळभोरांकडून कमळाचे राजू मिसाळ चितपट होण्याच्या मार्गावर
आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी-निगडी प्राधिकरणमध्ये प्रामाणिकपणा विरूद्ध संशय अशी लढत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणुकीचा रणसंग्राम आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी प्रभाग क्रमांक १५ मधील आकुर्डी गावठाणात जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादीचे उपमहापौर राजू मिसाळ हे स्वतःची घरे भरण्यासाठी भाजपमध्ये गेल्याचे नाव न घेता जाहीरपणे सांगितले. आताच्या निवडणुकीत राजू मिसाळ हे प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपकडून कमळ चिन्हावर लढत आहेत. कमळाच्या राजू मिसाळ यांच्यावर प्रचारात सातत्याने घोटाळे आणि मोकळ्या जागा बळकाविल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये भाजपला जनतेत नकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर घड्याळाच्या धनंजय काळभोर यांनी आक्रमक प्रचाराच्या जोरावर आघाडी घेतली असून, त्यांनी राजू मिसाळांना चितपट केल्यात जमा असल्याची चर्चा प्रभागात जोर धरू लागली आहे.
आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी-नि
सुशिक्षित मतदार असलेल्या या प्रभागात विशेषतः तरुण, महिला आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये भाजपने आणि राजू मिसाळ यांनी नगरसेवक म्हणून केलेल्या घोटाळ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे, तर घड्याळाच्या धनंजय काळभोर यांचा प्रचार हा मुद्देसूद, आक्रमक आणि जनतेच्या भावनांशी जोडलेला ठरत आहे. राष्ट्रवादीच्या धनंजय काळभोर यांनी गल्लीबोळातून मिळणारा प्रतिसाद पाहता घड्याळाचे धनंजय काळभोर विरूद्ध कमळाचे राजू मिसाळ ही लढत आता केवळ पक्षांची न राहता प्रामाणिकपणा विरुद्ध संशय अशी बनली आहे.
प्रभाग क्रमांक १५ मधील आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी-नि



