उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किवळेतील सभा रद्द म्हणजे पराभवाची नांदी
शिंदेंच्या अनुपस्थितीने प्रभागात शिवसेनेच्या पराभवाची वीट रचली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किवळे येथे शुक्रवारी होणारी बहुचर्चित सभा ऐनवेळी रद्द झाल्याने प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये प्
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची किवळे येथे सभा होणार, मोठा जनसागर उसळणार, शक्तिप्रदर्शन होणार, अशा वल्गना करणाऱ्या शिवसेनेला अखेर माघार घ्यावी लागली आहे. नेतृत्व न प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये न आल्याने शिवसैनिक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, संभ्रम आणि निराशा पसरली, तर मतदारांमध्ये “सभा रद्द का?” हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.
या प्रभागात स्थानिक पातळीवर आधीच जनतेच्या रोषाला सामोरे जात असलेल्या शिवसेनेसाठी ही सभा ‘लाईफलाईन’ मानली जात होती. मात्र तीच लाईफलाईन तुटल्याने शिवसेनेच्या प्रभागातील प्रचाराची हवा पूर्णपणे निघून गेल्याचे चित्र दिसत आहे. उलट विरोधकांच्या गोटात उत्साह संचारला असून “शिंदे येऊ शकले नाहीत, कारण जमिनीवर पाठिंबा नाही” अशी बोचरी प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. राजकीय जाणकारांच्या मते, नेतृत्वाची अनुपस्थिती ही फक्त सभा रद्द होण्याची घटना नसून, ती पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या कमकुवत संघटनशक्तीची जाहीर कबुली मानली जात आहे. किवळे परिसरात आधीच शिवसेनेची अवस्था गलितगात्र असताना आता शिवसेनेचे नेतृत्व मानल्या जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा रद्द झाल्याची घटना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत पक्षासाठी घातक ठरण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
एकूणच, सभा रद्द = विश्वास रद्द असे समीकरण प्रभाग क्रमांक १६ मधील मतदारांच्या मनात पक्के होत असून, रावेत-किवळे-मामुर्डी प्रभागात शिवसेनेच्या पराभवाची वीट रचली गेल्याचे चित्र दिवसेंदिवस ठळक होत आहे.



