बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १५ आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणमध्ये घड्याळाचा एल्गार

राष्ट्रवादीच्या धनंजय काळभोरांचा प्रचार बनतोय वादळ

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी आणि निगडी प्राधिकरणमध्ये निवडणुकीची लढत आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या धनंजय काळभोर, प्रीतमराणी शिंदे, सरिता साने आणि निलेश शिंदे या चारही उमेदवारांचा प्रचार सध्या प्रभाग हादरवून सोडत आहे. गल्लीबोळ, चौक, वस्ती-वस्तीमध्ये घड्याळाचा आवाज आता थेट सत्ताबदलाचा इशारा देताना दिसत आहे.

“बस्स… आता पुरे!” या आक्रमक भूमिकेतून धनंजय काळभोरांनी प्रचाराला सुरुवात करताच आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी आणि निगडी प्राधिकरणमध्ये वर्षानुवर्षांच्या अपूर्ण विकासकामांचा, दुर्लक्षित प्रश्नांचा आणि जनतेच्या संयमाची परीक्षा घेणाऱ्या कारभाराचा थेट जाब विचारायला सुरुवात केली आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, आरोग्य, शिक्षण या प्रत्येक मुद्द्यावर त्यांची भूमिका स्पष्ट, ठाम आणि विरोधकांना अस्वस्थ करणारी ठरत आहे.

प्रचारादरम्यान तरुणांचा प्रचंड उत्साह, महिलांचा ठाम पाठिंबा आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास पाहता घड्याळाच्या प्रचाराने प्रभाग क्रमांक १५ मध्ये लाट निर्माण केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. अनेक ठिकाणी विरोधकांचा प्रचार फिका पडत असताना, धनंजय काळभोर यांच्यासह राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांच्या सभोवती उसळणारी गर्दी हीच जनतेची भूमिका अधोरेखित करते. “शब्द नव्हे, हिशेब मागणार!” या घोषणेसह सुरू असलेला हा प्रचार केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, तो आकुर्डी गावठाण आणि निगडी प्राधिकरणातील जनतेच्या साचलेल्या असंतोषाचा स्फोट ठरत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक १५ मध्ये ही लढत आता केवळ उमेदवारांची न राहता अपयशी कारभार विरुद्ध ठाम नेतृत्व अशी बनत चालली आहे.

एकूणच प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या धनंजय काळभोर यांच्यासह इतर चारही उमेदवारांचा प्रचार हा आक्रमक, निर्णायक आणि निकालाची दिशा ठरवणारा ठरत असून या निवडणुकीत घड्याळ वेळेवर वाजणार, असेच संकेत प्रभागातील जनतेकडून मिळत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button