बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशालच्या अमोल भालेकर यांच्या प्रचाराची हवा 

रुपीनगरमध्ये मशालचा कहर; सत्ताधाऱ्यांचा ‘विकास’ कागदावरच उरला

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशाल चिन्हावर लढणाऱ्या अमोल भालेकर यांनी शुक्रवारी रुपीनगर परिसरात घरोघरी जाऊन प्रचार करत या प्रभागाचे नेतृत्व करणाऱ्या माजी नगरसेवकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या तथाकथित विकासकामांची थेट चिरफाड केली. या प्रभागातील गल्लीबोळातून पेटलेली मशाल आता सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर रोखठोक प्रश्न विचारत आहे. त्यामुळे अमोल भालेकर यांच्या प्रचाराला प्रभागातील नागरिकांकडून तुफान प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये रस्त्यांची दयनीय अवस्था, कायमस्वरूपी पाणीटंचाई, तुंबलेली ड्रेनेज व्यवस्था, कचऱ्याचा प्रश्न आणि दुर्लक्षित नागरी सुविधा, शिक्षणाचा बोजवारा या प्रत्येक मुद्द्यावर मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांनी प्रभागातील रुपीनगरमधील नागरिकांसमोर माजी नगरसेवकांचा आणि सत्ताधाऱ्यांचा ‘विकास फोल ठरल्याचा’ हिशेब मांडला. “सत्ता मिळाली, पण प्रभाग विसरला” असा थेट आरोप करत त्यांनी प्रचाराला आक्रमक धार दिली.

अमोल भालेकर यांच्यासोबत घरोघरी झालेल्या संवादात नागरिकांनीही आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. रुपीनगरच्या कानाकोपऱ्यात माजी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांविरोधातील संताप मशालच्या प्रचारातून बाहेर पडताना दिसला, तर अमोल भालेकर यांच्या स्पष्ट, निर्भीड भूमिकेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचा वाढता पाठिंबा पाहता रुपीनगरमध्ये सत्ता बदलाची ठिणगी पेटल्याचे संकेत मिळत आहेत. विरोधकांची कामगिरी कागदावरच मर्यादित असल्याचा दावा करत, अमोल भालेकरांनी “यावेळी प्रश्न विचारणारा नगरसेवक हवा” असा स्पष्ट संदेश दिला आहे.

एकूणच, रुपीनगरमध्ये घरोघरी पोहोचलेली मशाल म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या अपयशावरचा थेट वार ठरत असून, प्रभाग क्रमांक १२ मध्ये ही लढत आता शांत न राहता आक्रमक आणि निर्णायक वळणावर आली आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button