बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-बालाजीनगरमध्ये धनुष्यबाणाचा रणसंग्राम; घड्याळ-कमळ कोसळण्याच्या मार्गावर

महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके ठरतात सत्ता हादरवणारे ‘जायंट किलर’

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ८, इंद्रायणीनगर-बालाजीनगर-खंडेवस्ती-स्पाईन रस्तामध्ये निवडणूक आता शांत न राहता थेट रणांगणात उतरली असून, घड्याळ आणि कमळावर धनुष्यबाणाचा जबरदस्त प्रहार सुरू असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणारे महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके हे सध्या प्रभागातील सर्वात धोकादायक राजकीय समीकरण बनल्याची चर्चा उघडपणे रंगू लागली आहे. या दोघांनीही प्रचाराच्या माध्यमातून निवडणुकीत जायंट किलर ठरण्याच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे चित्र आहे. या  प्रभागात विकासाच्या नावावर स्वतःची घरे भरणारे माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपचा कारभार जनतेच्या डोळ्यासमोर असून, आता बदल हवा आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व हवे, अशी भावना प्रभागातील नागरिकांमध्ये जोर धरली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचारात धनुष्यबाणाचे बाण घड्याळ आणि कमळामध्ये जोरदार घुसल्याचे पाहायला मिळत आहे. 

घोषणांचा गोंगाट, आकड्यांची फसवी मिरवणूक आणि कागदावरचा विकास याला इंद्रायणीनगर-बालाजीनगर-खंडेवस्ती-स्पाईन रस्ता या प्रभागातील जनता साफ वैतागली असून घड्याळ-कमळाच्या तथाकथित ताकदीला आता थेट छेद दिला जात आहे. “काम दिसलं नाही, तर मतही नाही” या ठाम भूमिकेने मतदारांनी मोठ्या या दोन्ही पक्षांच्या गोटात घबराट निर्माण केली आहे. या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी आतापर्यंत केवळ आपली संपत्ती वाढविण्याचे काम केले आहे. आता ते उघडपणे कागदावरही दिसू लागले आहे. त्यामुळे या प्रभागातील जनतेने आता मतदानाबाबत गंभीरपणे विचार सुरू केला आहे. जनतेतील याच असंतोषामुळे धनुष्यबाळ चिन्हावर लढणारे महेंद्र सरवदे आणि माधुरी मुटके जोडीने घरोघरी जाऊन थेट प्रश्न विचारत प्रचाराची धार कमालीची वाढवली आहे. 

रस्ते, पाणी, ड्रेनेज, नागरी सुविधा या प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी महापालिकेत खाऊन खाऊन इकडून तिकडे उड्या मारणारे माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपच्या अपयशावर बोट ठेवत घड्याळ-कमळाच्या प्रचाराची हवा काढून घेतली आहे. प्रभाग क्रमांक ८ मधील तरुणांचा संताप, महिलांचा ठाम नकार आणि ज्येष्ठ नागरिकांची बोचरी प्रतिक्रिया पाहता गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे शोषण करून पोट फुगेपर्यंत आपल्या सात पिढ्यासाठी कमावलेल्या माजी नगरसेवकांची यंदाच्या निवडणुकीत गणिते कोलमडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. त्यामुळेच पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात प्रभाग क्रमांक ८ मधील घड्याळ व कमळ आणि धनुष्यबाण यांच्यात होणारी ही लढत आता “जायंट विरुद्ध जायंट किलर” अशीच ओळखली जात आहे.

प्रभाग क्रमांक ८ मध्ये धनुष्यबाण फक्त लढतोय असं नाही तो थेट सत्ता उलथवण्याच्या आणि लोकांचे शोषण करून घमंडीत वागणाऱ्या माजी नगरसेवकांना त्यांची जागा दाखवण्याच्या तयारीत आहे. महेंद्र सरवदे व माधुरी मुटके हे घड्याळ-कमळासाठी सर्वात मोठा धोका बनल्याचे वास्तव दिवसेंदिवस ठळक होत आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये यावेळी धनुष्यबाण सुटला आहे… आणि तो चुकणार नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया इंद्रायणीनगर-बालाजीनगर-खंडेवस्ती-स्पाईन रस्ता भागातील नागरिक मतदार व्यक्त करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button