बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १५ मधील सुशिक्षित जनता भडकली; टक्केवारीच्या खेळाला आणि कागदावरील विकासाला कंटाळली 

आकुर्डी-गंगानगर-वाहतूकनगरी-निगडी प्राधिकरणमधील नागरिकांचा घड्याळाच्या धनंजय काळभोरांवर विश्वास दुणावला

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी, निगडी प्राधिकरणमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रभागातील सुशिक्षित, जागरूक आणि प्रश्न विचारणारी जनता आता निवडणूक रिंगणातील माजी नगरसेवक व सत्ताधाऱ्यांच्या टक्केवारीच्या राजकारणाला आणि फक्त कागदावर दाखवलेल्या विकासाला कंटाळल्याचे पाहायला मिळत आहे. प्रभागात काम झाल्याचे “आकडे दाखवले, पण काम कुठे आहे?” हा प्रश्न आता प्रभागातील प्रत्येक गल्लीतून थेट विचारला जात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी मैदानात उतरलेल्या या प्रभागातील माजी नगरसेवक सत्ताधाऱ्यांची बोबडी वळत असून, यांच्याविषयी जनतेत प्रचंड रोष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय निश्चित असल्याचे पाहायला मिळत आहे. 

वर्षानुवर्षे सत्तेत बसून केवळ अहवाल, उद्घाटनं, फलक, दहीहंडी, दिवाळी पहाट आणि कागदावरील प्रगती दाखवणाऱ्या निवडणूक रिंगणातील माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपविरोधात प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे, आकुर्डी गावठाण असो, गंगागनर असो, वाहतूकनगरी असो की निगडी प्राधिकरणातील रस्त्यांची दुरवस्था, मोठे आणि प्रशस्त रस्ते लहान करणे, अपूर्ण कामे, निकृष्ट दर्जा आणि प्रभागात झालेल्या प्रत्येक कामातील निधीचा संशयास्पद वापर यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असलेले माजी नगरसेवक व सत्ताधारी भाजपची विश्वासार्हता पूर्णपणे ढासळल्याचे चित्र आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढणाऱ्या अनुभवी धनंजय काळभोर यांच्यावरील प्रभागातील सुशिक्षित नागरिकांचा विश्वास झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यांना असलेला प्रत्यक्ष कामाचा अनुभव, प्रश्नांची जाण आणि “दिसणारा नव्हे, टिकणारा विकास” ही भूमिका सुशिक्षित मतदारांना भावताना दिसत आहे. विशेषतः तरुण, नोकरदार वर्ग, व्यापारी आणि गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिक निवडणूक लढवत असलेल्या माजी नगरसेवकांच्या टक्केवारीच्या राजकारणाविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करत असून, “यावेळी अनुभवाला संधी” देण्याची ठाम भूमिका घेताना दिसत आहेत. घड्याळाचा प्रचार केवळ घोषणांपुरता न राहता, सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर थेट बोट ठेवणारा ठरत आहे.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये ही निवडणूक आता कागदावरील विकास विरुद्ध प्रत्यक्ष अनुभवटक्केवारीचे राजकारण विरुद्ध पारदर्शक काम अशी बनली असून या लढतीत सुशिक्षित जनता स्पष्टपणे घड्याळाच्या अनुभवी धनंजय काळभोर यांच्या पाठीशी उभी राहत असल्याचे चित्र ठळक होत आहे. यावेळी मत घोषणा पाहून नाही, हिशेब पाहून पडणार असा ठाम संदेश प्रभागातील नागरिकांमधून दिला जात आहे. त्यामुळे या प्रभागात राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांच्या विजयाची आशा पल्लवित झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button