बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये कमळाचे वारे वादळी

 दिपक भोंडवे भाजपच्या संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी मैदानात ठाम

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६, रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये सध्या एकच चित्र दिसत असून, भाजपच्या कमळाचे वारे प्रचंड वेगाने वाहू लागले आहेत. या प्रभागातील भाजपचे उमेदवार दिपक भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संपूर्ण पॅनेलचा विजय निश्चित करण्यासाठी प्रचार रणधुमाळीला आला आहे. प्रभागातील गल्लीबोळ, चौक, वस्तीवस्तीमध्ये कमळाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. 

“काम दाखवा, मग मत मागा” या ठाम भूमिकेतून दिपक भोंडवे यांनी प्रचाराला सुरुवात करताच विरोधकांची पळापळ सुरू झाल्याची चर्चा प्रभागात रंगली आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, नागरी सुविधा या प्रत्येक मुद्द्यावर केलेल्या कामांचा ठोस हिशेब मांडत भोंडवे यांनी प्रचारात आक्रमक धार आणली आहे. प्रचारादरम्यान दिपक भोंडवे आणि भाजपच्या पॅनेलला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद, कार्यकर्त्यांची ताकद आणि नागरिकांचा वाढता विश्वास पाहता कमळाच्या बाजूने निर्णायक वातावरण तयार होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. अनेक ठिकाणी विरोधकांचा प्रचार फिका पडताना दिसत असताना भाजपच्या प्रचारसभांमध्ये उसळणारी गर्दी हीच जनतेचा कल अधोरेखित करत आहे.

विशेषतः तरुण, महिला आणि मध्यमवर्गीय मतदारांमध्ये “स्थिर नेतृत्व आणि ठोस विकास” या मुद्द्यावर भाजपच्या दिपक भोंडवे व संपूर्ण पॅनेलला स्पष्ट पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक १६ मध्ये ही निवडणूक आता व्यक्तीगत न राहता कमळ विरुद्ध अपयश अशी बनत चालली आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये कमळाचे वारे आता झुळूक नसून वादळ बनले आहे आणि दिपक भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण पॅनेलचा विजय घडवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. यावेळी मत केवळ उमेदवाराला नाही विकासाला आणि कमळाला पडणार, असे चित्र रावेत-किवळे-मामुर्डीमध्ये दिसत आहे. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button