बॅनर न्यूज

प्रभाग क्रमांक १५ मधील गंगानगरमध्ये घड्याळाचा जोरदार गजर 

धनंजय काळभोर पॅनेलसह लोकांच्या घरोघरी, सत्ताधाऱ्यांची झोप उडाली

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी-निगडी प्राधिकरणमध्ये सध्या घड्याळाच्या गजरचा एकच आवाज घुमतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढणारे अनुभवी धनंजय काळभोर हे पॅनेलमधील प्रीतमराणी शिंदे, सरिता साने आणि नीलेश शिंदे यांना सोबत घेऊन थेट लोकांच्या घरोघरी पोहोचून जनतेच्या मनात घर केले आहे. धनंजय काळभोर यांनी या प्रभागातील प्रचारात आक्रमक आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये “घोषणांचा मारा खूप झाला, आता हिशेब हवा” या ठाम भूमिकेतून राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढणारे धनंजय काळभोर यांनी शनिवारी गंगानगरमधील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात सत्ताधाऱ्यांच्या कागदावरील विकासावर थेट बोट ठेवत प्रचाराला धार दिली आहे. धनंजय काळभोर यांच्यासह पॅनेलमधील इतर तानही उमेदवारांनी रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा, नागरी सुविधा या सगळ्या मुद्द्यांवर प्रभाग क्रमांक १५ मधील जनतेच्या रोषाला आवाज देत घड्याळाचा प्रचार अधिकच टोकदार केला आहे.

घरोघरी झालेल्या संवादात सुशिक्षित मतदारांचा संताप उघडपणे व्यक्त होत असून, “आकडे दाखवले, पण काम दिसलं नाही” अशी बोचरी प्रतिक्रिया या प्रभागातील माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. याचवेळी धनंजय काळभोर यांच्या अनुभवावर आणि पॅनेलच्या ताकदीवर प्रभागीतल जनतेचा विश्वास झपाट्याने वाढताना दिसत आहे. तरुणांचा उत्साह, महिलांचा ठाम पाठिंबा आणि ज्येष्ठ नागरिकांचा विश्वास पाहता गंगानगरमध्ये घड्याळ केवळ वाजत नाही, तर सत्ता बदलाचा आणि परिवर्तनाचा इशारा देत आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये विरोधकांच्या प्रचारात गोंधळ असताना, घड्याळाचा प्रचार मात्र संघटित, आक्रमक आणि मुद्देसूद ठरत आहे.

गंगानगरमध्ये घड्याळाचा गजर म्हणजे अपयशी कारभाराविरोधातील थेट बंड आणि धनंजय काळभोर पॅनेलसह लोकांच्या घरोघरी पोहोचत ही निवडणूक निर्णायक वळणावर नेत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यावेळी मत घोषणा पाहून नाही, अनुभव, हिशेब आणि घड्याळ पाहून पडणार असल्याची प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिक देत आहेत. 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button