बॅनर न्यूज

तळवडे गावठाण–रुपीनगर–त्रिवेणीनगरमध्ये अमोल भालेकर ठरताहेत सर्वांची पहिली पसंती 

प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय हवा फिरली; मशाल बनले जनतेच्या संघर्षाचे प्रतीक

Spread the love

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये अ जागेसाठी सध्या एकच वास्तव ठळकपणे दिसत आहे मशालचा प्रखर प्रकाश आणि मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांची वादळासारखी वाढलेली लोकप्रियता. तळवडे गावठाण असो, रुपीनगरच्या वस्त्या असोत वा त्रिवेणीनगरमधील नागरी वसाहती सर्वत्र एकच सूर उमटतोय: यावेळी अमोल भालेकर, यावेळी मशाल!. त्यामुळे प्रभागातील चार जागांमधील अ जागेवर मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर हे प्रभाग क्रमांक १२ मधील मतदारांच्या पहिल्या पसंतीस उतरल्याचे निवडणुकीतील चित्र आहे. 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल भालेकर यांनी प्रचाराच्या प्रत्येक फेरीत विरोधकांची हवा काढली असून, जनतेच्या प्रश्नांना थेट भिडणारा एकमेव नेता म्हणून ते पुढे आले आहेत. पाणी, रस्ते, ड्रेनेज, कचरा, अतिक्रमण, वाढती गुन्हेगारी आणि ढिसाळ कारभार या सगळ्यांवर अमोल भालेकर यांनी निर्भीडपणे बोट ठेवत प्रभाग क्रमांक १२ मध्ये निवडणूक लढवत असलेल्या माजी नगरसेवक व सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली आहे.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशाल हे केवळ चिन्ह राहिलेले नाही, तर संतापलेल्या जनतेच्या संघर्षाचे प्रतीक बनले आहे. वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या तळवडे गावठाणातील नागरिक असोत किंवा रुपीनगर-त्रिवेणीनगरमधील मूलभूत सुविधांपासून वंचित रहिवासी सर्वांच्या अपेक्षांना आवाज देणारा नेता म्हणून अमोल भालेकरांची निवड होत आहे. विशेष म्हणजे, भालेकरांचा आक्रमक, थेट आणि बेधडक प्रचार इतर उमेदवारांना व विरोधकांना अस्वस्थ करत आहे. सभा, पदयात्रा आणि घराघरांत पोहोचणाऱ्या संवादातून त्यांनी स्पष्ट संदेश दिला असून, समस्या सांगणार नाही, सोडवणार! याच ठाम भूमिकेमुळे विरोधकांचा प्रचार पोकळ ठरत आहे. 

अमोल भालेकर यांना जनतेतून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये राजकीय हवा फिरली आहे. मशाल पेटली आहे, आणि त्या मशालीचा प्रकाश अमोल भालेकरांना विजयाच्या दिशेने घेऊन जात आहे. ही निवडणूक आता फक्त बदलाची नाही, तर जुना अपयशी कारभार जाळून टाकण्याची आणि नव्या नेतृत्वाचा उदय जाहीर करण्याची झाली आहे. त्यामुळे तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button