प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणात धनंजय काळभोर सुपरहिट
प्रभागात घड्याळाचा धडाका; राष्ट्रवादीचे पॅनेल रचणार नवा राजकीय इतिहास

प्रभाग क्रमांक १५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय काळभोर यांनी प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात विरोधकांचे गणित कोलमडवले आहे. विकासाचा ठोस अजेंडा, सुसंस्कृत, शांत पण आक्रमक नेतृत्व आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर धनंजय काळभोर यांनी गेल्या आठ दिवसात प्रचाराला वेग दिला. प्रभागातील प्रत्येक घटकातून त्यांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. आकुर्डी गावठाणातील पारंपरिक मतदारांपासून ते निगडी प्राधिकरणातील सुशिक्षित मध्यमवर्गापर्यंत सर्वांच्या अपेक्षांचा सूर एकच म्हणजे काम करणारा नेता, निर्णय घेणारा आणि भविष्याची समज असणारा प्रतिनिधी हवा असाच आहे. लोकांच्या या अपेक्षांमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय काळभोर हे एकदम फिट बसत असल्याने ते प्रभागातील मतदारांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.
धनंजय काळभोर यांच्या रुपाने घड्याळाच्या चिन्हाने या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मधील मतदारांना विश्वासाचा वेळ दाखवायला सुरुवात केली आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता, वाहतूक, उद्याने, युवक-रोजगार अशा प्रत्येक मुद्द्यावर स्पष्ट भूमिका आणि ठाम आश्वासने देत धनंजय काळभोर यांनी गेल्या आठ दिवसात प्रचाराला धार दिली आहे. त्यामुळे विरोधकांची भाषणे बोथट, तर त्यांची रणनीती गोंधळात पडल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल एकजुटीने मैदानात उतरल्याने ही लढत आता केवळ विजयाची नाही, तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये राजकीय इतिहास घडवण्याची झाली आहे. बूथनिहाय नियोजन, कार्यकर्त्यांची फौज आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे प्रभाग १५ मध्ये राष्ट्रवादीची लाट स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये घड्याळाचा वेळ सुरू झाला आहे. प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय काळभोर सुपरहिट ठरत असून, राष्ट्रवादीचे पॅनेल यावेळी केवळ जिंकणार नाही, तर विकासाचा नवा अध्याय लिहिणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.



