प्रभाग क्रमांक १२, रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये मशालच्या अमोल भालेकरांचा प्रचार धडाक्यात
मशाल हातात, परिवर्तन दारात!; प्रभागात माजी नगरसेवकांच्या विरोधात जनआक्रोश

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२, तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्ये अ जागेवर लढणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अमोल भालेकर यांच्या प्रचाराने संपूर्ण प्रभाग भगवेमय झाला आहे. अमोल भालेकर यांनी रविवारी रुपीनगर आणि त्रिवेणीनगरमध्ये घरोघरी जनतेशी संवाद साधला. प्रभाग क्रमांक १२ मध्ये सध्या एकच चर्चा मशाल पेटली आहे आणि परिवर्तन दारात उभं आहे. प्रभागातील गल्लीबोळ, चौकाचौकांतून उमटणारा जनतेचा आवाज स्पष्ट सांगतोय यावेळी शब्द नाही, थेट कृती हवी; यावेळी मशाल हवी, असा आवाज घुमत आहे.
प्रभाग क्रमांक १२ मध्ये वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या समस्या, ढिसाळ प्रशासन, दुर्लक्षित नागरिक आणि केवळ आश्वासनांवर चाललेला कारभार या सगळ्यांवर मशाल चिन्हावर लढणारे अमोल भालेकर यांनी थेट हल्लाबोल केला आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण आणि सुरक्षेचे प्रश्न अशा प्रत्येक मुद्द्यावर अमोल भालेकरांनी प्रभागातील जनतेसमोर निर्भीड भूमिका मांडत निवडणूक रिंगणात असलेले माजी नगरसेवक आणि सत्ताधारी भाजपची राजकीय कोंडी केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये मशाल हे चिन्ह केवळ निवडणूक चिन्ह राहिलेले नाही, तर तळवडे गावठाण-रुपीनगर- त्रिवेणीनगरमधील संतप्त आणि अपेक्षाभंग झालेल्या जनतेच्या संघर्षाचे प्रतीक बनले आहे. घराघरांत जाऊन संवाद साधताना अमोल भालेकर यांचा एकच ठाम संदेश आहे समस्या ऐकून घेणार नाही, त्या सोडवणारच! याच आक्रमक आणि ठोस भूमिकेमुळे प्रभागातील तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कामगार वर्गातून त्यांना प्रचारात प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
या प्रभागातील प्रचारादरम्यान अमोल भालेकर हे विरोधी उमेदवारांवर भारी पडले असून, त्यांचा झंझावाती संपर्क मोहीम विरोधी उमेदवारांच्या गोटात अस्वस्थता निर्माण करत आहे. तळवडे गावठाण-रुपीनगर-त्रिवेणीनगरमध्



