प्रभाग क्रमांक १५ मध्ये पहाटेच घड्याळाचा गजर; मॉर्निंग वॉकर्ससोबत धनंजय काळभोरांचा थेट संवाद
आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणात जनतेच्या पायवाटेवर राष्ट्रवादीच्या पॅनेलचा प्रचार

पिंपरी : प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-गंगानगर-वाहतूकनगरी-नि
उद्यानं, चालण्याचे ट्रॅक, मोकळी मैदाने म्हणजे जिथे आरोग्य, शिस्त आणि जागरूक नागरिकांची उपस्थिती असते, तिथेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय काळभोर यांनी पक्षाच्या पॅनेलसह विकासाची चर्चा उघडली. प्रभागात नित्याचीच झालेली वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था, उद्यानांची देखभाल, सुरक्षितता आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा यावर स्पष्ट, मुद्देसूद आणि ठाम भूमिका मांडत धनंजय काळभोर यांनी नागरिकांचा विश्वास जिंकला. हा संवाद औपचारिक नव्हता; तो होता समस्या ऐकून तत्काळ उपाय सुचवणारा, नेतृत्वाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा.
घड्याळ हे केवळ चिन्ह नाही, तर वेळेवर निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाचे प्रतीक असल्याचा संदेश धनंजय काळभोर आणि नागरिकांमध्ये झालेल्या संवादातून ठसठशीतपणे पुढे आला. राष्ट्रवादीच्या पॅनेलमधील प्रत्येक उमेदवाराने आपापल्या क्षेत्रातील कामांचा आराखडा मांडत, एकसंध टीम म्हणून काम करण्याची ग्वाही दिली. त्यामुळे मॉर्निंग वॉकर्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांविषयी केवळ सकारात्मक चर्चा नाही, तर उत्स्फूर्त पाठिंब्याची लाट पाहायला मिळाली.
विशेष म्हणजे, पहाटेपासूनच सुरू झालेल्या या प्रचाराने विरोधकांची रणनीती गोंधळात टाकली आहे. जेव्हा इतर अजून दिवसाची तयारी करत होते, तेव्हा धनंजय काळभोर आणि त्यांचे पॅनेल जनतेच्या दारात नव्हे, चालण्याच्या पायवाटेवर उभे होते. त्यामुळे प्रभाग क्रमांक १५ मध्ये घड्याळाची वेळ सुरू झाली आहे. थेट संवाद, टीमवर्क आणि विकासाचा ठोस अजेंडा यामुळे धनंजय काळभोर यांचा हा मॉर्निंग वॉक प्रचार राजकीयदृष्ट्या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चारही उमेदवारांसाठी गेम-चेंजर ठरत असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.



