बॅनर न्यूज

अवघ्या ६७० मतांनी पराभव…आता घड्याळाचे संपूर्ण पॅनेल निवडून आणणार!

प्रभाग १५ मध्ये धनंजय काळभोरांचा आरपारचा एल्गार

Spread the love

पिंपरी : प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणमध्ये गेल्या निवडणुकीत अवघ्या ६७० मतांनी झालेला पराभव हा पराभव नव्हता, तर जनतेच्या मतांचा घोर अपमान होता, अशीच भावना आज प्रभागात उसळताना दिसत आहे. त्या अन्यायकारक निकालाचा हिशोब चुकता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय काळभोर पुन्हा एकदा रणांगणात उतरले असून, यावेळी फक्त विजयच! असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संपूर्ण पॅनेल निवडून आणून हा विजय साजरा करणार असा आरपारचा एल्गार धनंजय काळभोर यांनी पुकारला आहे. 

२०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १५ मध्ये धनंजय काळभोर यांचा विजय अवघ्या ६७० मतांनी हुकला होता. त्या निवडणुकीत हरवलेली हीच ६७० मते आज प्रभाग क्रमांक, १५, आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणातील जनतेच्या रोषात बदलली आहेत. निवडून आलेल्या नगरसेवकांनी या प्रभागातील सुशिक्षित मतदारांना दिलेल्या खोट्या आश्वासनांचा, भ्रष्ट कारभाराचा आणि विकासाच्या फसव्या दाव्यांचा भांडाफोड काळभोर थेट रस्त्यावर उतरून करत आहेत. नगरसेवकांनी पाच वर्षात केवळ दहीहंडी, दिवाळी पहाट यांसारखे कार्यक्रम राबवून या प्रभागातील नागरिकांना केवळ भुलवत ठेवण्याचे काम केले. पिंपरी-चिंचवडमधील एक आदर्श आणि सुव्यवस्थित परिसर म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात आपली ओळख तयार केलेल्या निगडी प्राधिकरण आणि आकुर्डी भागाचा सत्ताधारी नगरसेवकांनी पाच वर्षात पार विचका करून टाकला आहे. त्यामुळेच “तेव्हा ६७० मतांनी हरलो, पण आज ६७० घरांतून बदलाचा आवाज उठतो आहे,” असे म्हणत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय काळभोर यांनी प्रभाग क्रमांक १५ मध्ये सत्ताधाऱ्यांची अक्षरशः झोप उडवली आहे.

पुन्हा पुन्हा निवडून येणाऱ्या त्याच त्याच नगरसेवकांच्या ठेकेदारांकडून केवळ मलई खाण्याच्या वृत्तीमुळे प्रभाग १५ मध्ये आजही रस्ते, पाणी, ड्रेनेज, वीज, कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचा नालायक कारभार उघडा पडली आहे. या अपयशाची किंमत आता सत्ताधारी नगरसेवकांना मोजावीच लागेल, असा इशारा देत धनंजय काळभोर यांनी ‘हिशोबाचा दिवस जवळ आला आहे’ असे स्पष्ट संकेत दिले आहेत. आकुर्डी गावठाण-निगडी प्राधिकरणमधील जनतेमध्ये प्रचंड संताप, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि विरोधकांमध्ये भीती पसरली असून, प्रभाग क्रमांक १५ मध्ये यावेळी ६७० मतांचा पराभव इतिहासजमा करून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलच्या निर्णायक विजयाचा भूकंप घडवण्याची तयारी धनंजय काळभोर यांनी केली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button