बॅनर न्यूज

आकुर्डी-निगडी प्राधिकरणात भ्रष्टाचाराचा कळस, दुर्लक्षाची परिसीमा आणि खोट्या आश्वासनांचा शेवट 

प्रभाग १५ मध्ये घड्याळाचे धनंजय काळभोरच जनतेचा अंतिम फैसला !

Spread the love
पिंपरी : प्रभाग क्रमांक १५, आकुर्डी गावठाण-गंगागनगर-वाहतूकनगरी-निगडी प्राधिकरणमध्ये सध्या जनतेच्या मनात एकच भावना दाटून आली आहे ती म्हणजे आता पुरे! वर्षानुवर्षे सत्तेच्या छत्राखाली लपून भ्रष्टाचार, दुर्लक्ष आणि फसव्या आश्वासनांचे राजकारण करणाऱ्यांविरोधात या प्रभागातील नागरिकांचा संयम सुटला असून, परिवर्तनाचा स्पष्ट कौल दिला जात आहे. दहा-दहा, पंधरा-पंधरा वर्षे सत्तेचा उपभोग घेऊनही प्रभागाला अक्षरशः वाऱ्यावर सोडणाऱ्या माजी नगरसेवकांविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला असून, “आता हिशेब द्यायची वेळ आली आहे” असा ठाम सूर सर्वत्र प्रभागात ऐकू येत आहे. या प्रभागात घड्याळ चिन्हावर लढणारे धनंजय काळभोर यांंचाच विजय असा येथील जनतेचा अंतिम फैसला झाल्याचे दिसत आहे.

प्रभाग क्रमांक १५ मध्ये खड्ड्यातील रस्ते आहेत, पाणी नाही, कामे अर्धवट, तक्रारी धूळ खात पडलेल्या आणि नागरिकांना गृहित धरण्याचा अहंकार हाच माजी नगरसेवकांचा तथाकथित “विकास” आज उघड्या अंगाने जनतेसमोर उभा आहे. निवडणूक आली की खोटी स्वप्ने दाखवायची आणि नंतर पाच वर्षे गायब व्हायचे, हा माजी नगरसेवकांचा जुना फसवा पॅटर्न आता पूर्णपणे कोसळला आहे. अशा परिस्थितीत या प्रभागात  घड्याळ या चिन्हावर लढणारे धनंजय काळभोर हे प्रभाग १५ मधील जनतेचा संताप, अपेक्षा आणि बदलाची ताकद बनून मैदानात उतरले आहेत. त्यांचा प्रचार म्हणजे सभा नव्हे, तर अपयशी सत्तेला वाचायला लावलेले आरोपपत्र ठरले आहे.

निवडणुकीचा प्रचार शेवटाकडे जात असताना प्रभाग क्रमांक १५ मधील गल्ल्या, वस्त्या, सोसायट्या, चौकाचौकांतून एकच आवाज घुमतोय, “फसवणूक पुरे!”, “आश्वासनांचा बाजार बंद करा!”
“काम करणारा नेता हवा, बोलघेवडा नव्हे!”. घड्याळाच्या या प्रचाराला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून या प्रभागातील निवडणूक रिंगणात असणाऱ्या माजी नगरसेवकांची झोप उडाली असून त्यांचा आत्मविश्वास अक्षरशः गळून पडला आहे. मुद्दे नाहीत, काम नाही, हिशेब नाही, उरली आहेत फक्त सबबी, आरोप आणि पळवाटा, अशी या माजी नगरसेवकांची अवस्था झाली आहे.

या पार्श्वभूमीवर घड्याळ या चिन्हावर लढणारे धनंजय काळभोर हे प्रभाग १५ मधील विश्वासाचे, सातत्याचे आणि कामाचे प्रतीक म्हणून पुढे आले आहेत. राजकारणात गाजावाजा नव्हे, तर प्रत्यक्ष काम, थेट संवाद आणि जबाबदारीची भूमिका हेच धनंजय काळभोर यांचे बलस्थान ठरत आहे. प्रभागातील गल्ल्या, वस्त्या, सोसायट्या आणि बाजारपेठांमध्ये नागरिकांकडून एकच सूर उमटतोय तो म्हणजे “खोट्या वचनांपेक्षा काम महत्त्वाचे!”, “दिसणारा नव्हे, काम करणारा नेता हवा!”. त्यामुळे घड्याळाचे धनंजय काळभोर हेच प्रभाग क्रमांक १५ मधील जनतेचा ठाम, स्पष्ट आणि अंतिम निर्णय ठरत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button